रोहोकले यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब रोहोकले यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, आशा भाऊसाहेब रोहोकले, नंदा वाघमारे, वर्षा रोहोकले, प्रसाद वाघमारे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने रोहोकले यांनी सातत्याने शासनस्तरावर शिक्षकांचे प्रश्न मांडले आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला असून, त्यांच्या निवडीने शिक्षकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना भाऊसाहेब रोहोकले यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहणार आहे. सत्काराने काम करण्यास आनखी बळ मिळणार असून, सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे पुन्हा काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.