• Thu. Mar 13th, 2025

दंडवते बंधूंचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला

ByMirror

Apr 26, 2023

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी किरण दंडवते उर्फ चिन्या व आकाश दंडवते उर्फ चिंट्या (रा. सावेडी) यांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला.


योगेश गलांडे यांना 13 मार्च रोजी एमआयडीसी येथे आकाश दंडवते व त्यांचा मोठा भाऊ किरण दंडवते यांनी कंपनीतील व्यवहाराच्या वादातून जीवघेणा हल्ला करुन जबर मारहाण केली होती. जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला 20 मार्च रोजी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील आरोपी आकाश दंडवते याला पोलीसांनी अटक केली. तर दुसरा आरोपी किरण दंडवते अद्यापि फरार आहे. दोन्ही आरोपींच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात जामीन ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी सत्र न्यायाधीश शित्रे यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायाधीश शित्रे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोमवारी (दि.24 एप्रिल) या प्रकरणातील दंडवते बंधूचा जामीन फेटाळला. गलांडे यांच्या वतीने अ‍ॅड. विवेक म्हसे पाटील व अ‍ॅड. सागर वाव्हळ यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *