• Fri. Jan 30th, 2026

थायलंडच्या आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरच्या नयना खेडकर हिचे यश

ByMirror

Feb 8, 2023

प्रतिस्पर्धीला तिसर्‍या राऊंड मध्ये केले नॉक आऊट

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मुई थाई स्पर्धेत नगरची युवती नयना खेडकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश मिळवले. थाई किक बॉक्सिंगचा प्रकार असलेली ही स्पर्धा नुकतीच थायलंडमधील चांग मई या शहरात पार पडली. यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.


नयना खेडकर या मुळच्या अहमदनगर शहरातील असून, त्या सध्या थायलंड येथेच राहून मुई थाई या खेळाचा सराव करत आहे. त्यांनी या स्पर्धेत थायलंडमधील आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी प्रकैथिप यास तिसर्‍या राऊंड मध्ये नॉक आऊट करत दणदणीत विजय प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवण्याचा मान पटकाविला आहे.


खेडकर या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून यशस्वी वाटचाल करत आहेत. सध्या गृहिणी असलेल्या लता खेडकर आणि निवृत्त पोलिस अधिकारी कै. निवृत्ती (एन.डी.) खेडकर यांच्या कन्या आहेत.

त्या थायलंडमधील माये हाँगसन ह्या जिल्ह्यातील पाई हुआ या ठिकाणी सिटजेम् जिम मध्ये या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. या यशाबद्दल आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी कौतुक केले असून, सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *