• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप

ByMirror

Dec 8, 2022

दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

धार्मिक कार्यक्रमातून एकत्र आलेल्या समाजाला एक दिशा मिळते -शिवाजी कर्डिले

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरात अखंड नाम, गुरुचरित्र पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी श्री दत्त यांच्या मुर्तिस अभिषेक होऊन माजी नगरसेवक पैलवान संभाजी लोंढे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. संध्याकाळी महाआरती होऊन महाप्रसादावे वाटप करण्यात आले. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाची सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने दर्शनास उपस्थित असलेल्या शहरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी भानुदास घोडके, मनोज लोंढे, महेश लोंढे, आकाश दळवी, अभिजीत भिंगारदिवे, अ‍ॅड. अक्षय दांगट, सुरज शिंदे, ननू खरमाळे, तारे खरमाळे, भाऊ घावटे, बाळासाहेब नलगे, दत्ता खैरे, संतोष जगताप, माधुरी लोंढे, वृषाली लोंढे आदींसह समाजबांधव व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी कर्डिले म्हणाले की, भक्तीमार्गाने जीवनात ध्येय गाठण्यासाठी ऊर्जा मिळत असते. भक्तीने जीवनात आनंद व समाधान निर्माण होऊन समाजकार्य देखील घडत असते. राजकारण, समाजकारण व धार्मिक क्षेत्रात देखील लोंढे कुटुंबीय मोठे योगदान देत आहे. विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या समाजाला एक दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक पैलवान संभाजी लोंढे यांनी दरवर्षी भाविकांसाठी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असल्याची माहिती दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *