हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मर्चंट व शहर बँकेतील संचालकांचा सत्कार
तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणार्या ग्रुपच्या सदस्यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. जीवन निरोगी असल्यास जीवनाचा आनंद घेता येतो. हरदिन मॉर्निंग ग्रुप निरोगी आरोग्याची चळवळ चालवत आहे. तर पर्यावरण संवर्धनासाठी देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले. तर भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कला दत्तक घेण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने मर्चंट व शहर सहकारी बँकेतील संचालकांचा तसेच विविध क्षेत्रात यश प्राप्त करणार्या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तर वाढदिवस असलेल्या सदस्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक फिरोदिया बोलत होते. भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, संतोष लुनिया, किशोर बोरा, जयकुमार मुनोत, सर्वेश सपकाळ, प्रांजली सपकाळ, सुरेखा आम्ले, निर्मलाताई येलुलकर, सुजाता भिंगारकर, सविता परदेशी, विकास भिंगारदिवे, दिनेश शहापूरकर, नामदेवराव जावळे, चुनीलाल झंवर, किशोर भिंगारकर, अभिजीत सपकाळ, सुमेश केदार, सरदारसिंग परदेशी, एकनाथ जगताप, संतोष हजारे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य चळवळीसह वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबवित आहे. तसेच ग्रुप मधील सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सन्मान करुन प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात मर्चंट बँकेच्या संचालकपदी आनंतराम मुनोत, मीनाताई मुनोत, शहर सहकारी बँकेच्या संचालकपदी अशोकराव कानडे, शिवाजी कदम, निखिल नहार, प्रदीप जाधव निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रुपच्या वतीने नरेंद्र फिरोदिया यांचा विशेष सन्मान करुन ग्रुपचे सदस्य असलेल्या उत्कृष्ट अभिनेत्री विद्या जोशी, सिताराम परदेशी, किशोर भगवाने, सीए रवींद्र कटारिया, भारती कटारिया, जालिंदर बोरुडे, ईवान सर्वेश सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. मिलिटरी इंजिनियर सर्व्हिस मधून सेवानिवृत्त झालेले विठ्ठलराव राहिंज व राजश्री राहिंज यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तर दिनकरराव धाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
मीनाताई मुनोत म्हणाल्या की, हरदिन मॉर्निंग ग्रुपने भिंगारमध्ये निरोगी आरोग्याचा पाया रचला. मागील 23 वर्षापासून हे कार्य सतत अविरतपणे सुरू असून, पर्यावरणासाठी त्यांचे सुरू असलेले वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर नरेंद्र फिरोदिया यांनी विविध क्षेत्रात योगदान देऊन आपल्या परिवाराचे नाव उंचावले आहे. फिरोदिया परिवाराचा सामाजिक वारसा ते समर्थपणे पुढे घेऊन जात आहे. मानव सेवा हीच ईश्वरसेवा याप्रमाणे त्यांचे कार्य सुरु असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले.
अशोकराव कानडे यांनी सर्वांचे जीवन आनंदी व निरोगी करण्यासाठी हरदिनचे कार्य प्रेरणादायी आहे. शहर हे एक कुटुंब असून, अशा ग्रुपच्या माध्यमातून कुटुंब एकमेकांना जोडले जात आहे. कुटुंबात झालेला सत्कार कार्य करण्यास बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रुपचे सदस्य संजय भिंगारदिवे, किरण फुलारी, मनोहर दरवडे, दीपक दाडगे, राजू कांबळे, अविनाश काळे, दिलीप गुगळे, रामनाथ गर्जे, बापू तांबे, गोरख उबाळे, अविनाश जाधव, विशाल भामरे, अशोकराव पराते, मुन्ना वाघस्कर, शंकरराव पंगुडवाले, राजू पांढरे, उद्धवराव चेमटे, अविनाश पोतदार, सूर्यकांत कटोरे, अनंत सदलापूर, कुमार धतुरे, जालिंदर अळकुटे, देविदास गंडाळ, सचिन कस्तुरे, प्रमोद सोळंकी, अनंतसिंग राठोड, संतोष शेलूकर, अनंत जायभाय, भाऊसाहेब गुंजाळ, सिध्दू बेरड, योगेश चौधरी, प्रवीण परदेशी, राहुल भिंगारदिवे, नितीन भिंगारकर, वैभव गुगळे, विलास तोतरे, अशोक भगवाने, जालिंदर बेल्हेकर, सुहास देवराईकर, राजू शेख, शेषराव पालवे आदी उपस्थित होते.