चौकशी समिती गठितकरण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय व ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या योजनांच्या खर्चात असलेल्या अनियमितता बाबत वेळोवेळी पत्रव्यवहार, निवेदन, तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र देऊन मुंबई येथील मुख्य लेखापाल यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला.
राष्ट्रीय व ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या योजनांच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. मागील चार महिन्यापासून याबाबत चौकशी होण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कुठलीही चौकशी समिती गठित करण्यात आलेली नाही. याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उपोषणाचा पवित्रा संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.