• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हास्तरीय इज्तेमाच्या तयारीची माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंनी केली पहाणी

ByMirror

Dec 10, 2022

पाणी, वीज, रस्ते व बंदोबस्ताच्या पार्श्‍वभूमीवर संबंधीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना

मुस्लिम समाजाच्या इज्तेमासाठी नेहमीच सहकार्य राहणार -कर्डिले

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसाच्या मैदानावर 16 व 17 डिसेंबर रोजी होत असलेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

बाराबाभळी मदरसेच्या 65 एकर मैदानावर होत असलेल्या इज्तेमात एक ते दीड लाख मुस्लिम समाज बांधव उपस्थित राहणार असून, या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या नियोजनाची माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी (दि.10 डिसेंबर) पहाणी केली.


माजी मंत्री कर्डिले यांनी या इज्तेमाच्या तयारीसाठी पाणी, वीज, रस्ते व बंदोबस्ताच्या पार्श्‍वभूमीवर संबंधीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना फोनवर संपर्क करुन सूचना केल्या. यावेळी जिम्मेदार अब्दुस सलाम, हाजी मन्सूर शेख, हाजी नजीर हुसेन, हाजी शौकत तांबोळी, हाजी शेख अब्दुल रऊफ (टायरवाले), हाजी अकिल रफीयोद्दीन, उस्मानभाई मल्लेवाले, मदरसेचे विश्‍वस्त कारी अब्दुल कदीर, शाकीर शेख, हुसेन (जनसेवा), जे.के. एजाज, असिफ शेख, राहुल पानसरे, महेश झोडगे, राहुल घोडके, रवी पल्ले, सचिन जाधव, राकेश ताठे आदी उपस्थित होते.


शिवाजी कर्डिले म्हणाले की, बाराबाभळी येथे जिल्हास्तरीय इज्तेमाची तयारी चांगली व नियोजनपूर्वक करण्यात आली आहे. नगर तालुका व राहुरी मतदार संघात मुस्लिम समाजाच्या इज्तेमासाठी नेहमीच सहकार्य करण्यात आले आहे. या इज्तेमासाठी गावाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचे सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर इज्तेमाची विशेष बाब म्हणजे या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम भाविक स्वयंशिस्तीने सहभागी होत असल्याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी कर्डिले यांनी या इज्तेमाच्या बंदोबस्त व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना संपर्क साधून नियोजन करण्याचे सांगितले. तर पाण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने कर्डिले यांचा सत्कार करुन, त्यांना होणार्‍या इज्तेमासाठी आमंत्रित करण्यात आले.


कोरोनाच्या दोन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात इज्तेमा होत असल्याने त्याची तयारी देखील तेवढीच जय्यत करण्यात आली आहे. 16 डिसेंबरला शुक्रवारी सकाळच्या नमाज व बयाननंतर मोठ्या उत्साहात इज्तेमाला प्रारंभ होणार आहे. या इज्तेमासाठी दिल्ली येथून मौलाना उपस्थित राहणार आहे. मदरसेतील 35 हाफिज झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात येणार आहे. शनिवारी 17 डिसेंबरला संध्याकाळी विश्‍वाशांती व भाईचारासाठी सामुहिक दुवाने इज्तेमाचा समारोप होणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *