• Fri. Mar 14th, 2025 5:49:13 PM

जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मल्लखांबचे पूजन

ByMirror

Jun 16, 2023

अहमदनगर मल्लखांब असोसिएशनचा मल्लखांब दिनाचा उपक्रम

मल्लखांबातील खेळाडू शहराची एक वेगळी ओळख निर्माण करतील -संभाजी कदम

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे अहमदनगर मल्लखांब असोसिएशनच्या वतीने मल्लखांब दिनानिमित्त मल्लखांबचे पूजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले व शिवसेनेचे (ठाकरे गट) शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या हस्ते मल्लखांबला नारळ वाढवून पूजा करण्यात आली.

यावेळी शिवाजी कदम, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरांगे, शहर बँकेचे संचालक शिवाजी कदम, वस्ताद अनिल गुंजाळ, शशिकांत नजन, मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धोत्रे, उपाध्यक्ष नंदेश शिंदे, राजाभाऊ अवसक, सचिव अनंत रिसे, सहसचिव मोहिनीराज लहाडे, अजित लोळगे, खजिनदार होनाजी गोडळकर, निलेश कुलकर्णी, विष्णू देशमुख, अमित जिन्सीवाले, राम गोडळकर, सुनील गोडळकर, राजेश भालसिंग, सतीश दारकुंडे, मुकुंद देशमुख, एस.एल. देशमुख, स्मिता कुलकर्णी, लीना धोत्रे, सौ. शिंदे आदींसह खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाल्या की, शारीरिक व्यायामासाठी मल्लखांब सर्वोत्तम क्रीडा प्रकार आहे. प्राचीन काळापासून या खेळाला परंपरा आहे. संध्याकाळी खेळाडूंना मल्लखांबचा सराव मार्गदर्शकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी मल्लखांब खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.


संभाजी कदम म्हणाले की, मराठी संस्कृतीतला खेळ असलेला मल्लखांबचे वर्ग क्रीडा संकुलमध्ये होत असल्याचा अभिमान वाटत आहे. कचरा साचलेल्या ठिकाणची जागा स्वच्छ करुन मल्लखांबचे तयार केलेले मैदानातून खेळाडू घडणार आहे. सदृढ आरोग्यासाठी युवकांना मैदानाकडे चला, सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. मैदाने रिकामी होत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहे. निरोगी व सदृढ आरोग्यासाठी मैदानाकडे वळाल्यास सशक्त समाज निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मल्लखांबातील खेळाडू शहराची एक वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची आशा व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.


प्रारंभी बाळंभट्ट दादा देवधर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बाळंभट्ट दादा देवधर यांची माहिती होनाजी गोडाळकर यांनी सांगितली. यावेळी आंतरराष्ट्रीय पंच अमित जिनसीवाले यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले. प्रास्तविक निलेश कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांची ओळख सचिव अनंत रिसे यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश शिंदे यांनी केले. आभार अध्यक्ष राजाभाऊ धोत्रे यांनी मांनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *