• Sat. Mar 15th, 2025

छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धेसाठी मैदान पूजन

ByMirror

Apr 11, 2023

शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुलला 20 ते 23 एप्रिल रोजी रंगणार कुस्तीचा थरार

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्‍या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मंगळवारी (दि.11 एप्रिल) मैदानाचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने ही तीन दिवसीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे.


मैदानाचे पूजन नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी डॉ. एस.एस. दीपक, भाजप शहराध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, युवा नेते सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, गोरख खंडागळे, श्याम लोंढे, तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, वसंत लोंढे, सचिन पारखे, मोहन हिरणवाळे, मनिष साठे, बाळासाहेब भुजबळ, दत्ता गाडळकर, विशाल गर्जे, संतोष गांधी, नितीन शेलार, सुहास पाथरकर, सागर शिंदे, बाळासाहेब गदादे, प्रताप चिंधे, सुचित खरमाळे, कैलास गर्जे, नामदेव लंगोटे, मिलिंद भालसिंग, कुंडलिक गदादे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.


डॉ. एस.एस. दीपक म्हणाले की, शहराला कुस्ती खेळाचा मोठा वारसा आहे. अनेक नामवंत मल्ल या कुस्तीमध्ये घडले असून, राज्यासह देशातील मैदान त्यांनी गाजवले आहे. कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेली स्पर्धा कौतुकास्पद असून, या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी सर्वांनी सहभागी होवून योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.


छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे माती व गादी विभागात रंगणार आहे. माजी पालकमंत्री आ. राम शिंदे या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या खेळाडूस अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय विजेत्या मल्लास दोन लाख, तर तृतीय स्पर्धकास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच विविध वजन गटात लाखो रुपयांचे बक्षीसं ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. या स्पर्धेसाठी शिवसेना, भाजप व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *