• Wed. Feb 5th, 2025

कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या पदाधिकारींच्या शिष्टमंडळाने घेतली प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट

ByMirror

May 28, 2022

कौटुंबीक न्यायालयात वकील व पक्षकारांना येणार्‍या अडचणी सोडविण्यास सहकार्य करणार -प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा

अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबीक न्यायालय अहमदनगर येथे वकील बंधू भगिनींना व पक्षकारांना येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यास निश्‍चितपणे सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी आज प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लगड्डा यांची भेट घेऊन पक्षकार व वकील बंधू भगिनींना कौटुंबिक न्यायालयात येणार्‍या अडीअडचणी संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी आलेल्या शिष्टमंडळास प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य राहणार असल्याचे आश्‍वासित केले.


प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचा कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या वतीने विशेष सरकारी वकील तथा बार असोसिएशनचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुरेश लगड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव कराळे, उपाध्यक्ष अ‍ॅड.एल.बी. कचरे, खजिनदार अ‍ॅड. राजेश कावरे, सहसचिव अ‍ॅड. अर्चना सेलोत, जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. आर.पी. सेलोत, अ‍ॅड. सत्यजीत कराळे, अ‍ॅड. शिवाजी सांगळे, अ‍ॅड. मच्छिद्र अंबेकर, अ‍ॅड. राजाभाऊ शिर्के, अ‍ॅड. अनुराधा येवले, अ‍ॅड.अनिता दिघे, अ‍ॅड.सुचीता बाबर आदी वकील मंडळी उपस्थित होते. अ‍ॅड. शिवाजी कराळे यांनी सर्व पस्थित पदाधिकारी यांचा परीचय करुन दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *