• Thu. Jul 24th, 2025

केडगाव बायपास चौक येथे हॉटेल कृष्णचैतन्य प्युअर व्हेज थाळी दालनाचा शुभारंभ

ByMirror

May 23, 2023

आमदार संग्राम जगताप व निलेश लंके यांची उपस्थिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या 18 वर्षापासून स्वाद, सेवा व चवीच्या माध्यमातून खवय्यांच्या मनात विश्‍वास निर्माण केलेल्या गणराज ग्रुप ऑफ हॉटेलच्या वतीने केडगाव बायपास चौक येथे सुरु करण्यात आलेल्या हॉटेल कृष्ण चैतन्य प्युअर व्हेज या नवीन दालनाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप व आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाला.

यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, आंतरराष्ट्रीय कुस्ती विजेते पै. राजकुमार आघाव पाटील, गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर इंजि. गणेश आघाव पाटील, शिक्षकनेते नितिन मोकळ, सागर पंजाबी, उद्योजक बाळासाहेब बारस्कर, उद्योजक आशिष कुमार, इंजि. संतोष मोकळ, गंगाधर मोकळ, लक्ष्मणराव आघाव पाटील, नांदगावच्या माजी सरपंच सुनिताताई आघाव, आर्मी इंजि.विवेक पाखरे, कृष्णा जायभाय, कृष्णवर्धन आघाव पाटील, चैतन्य आघाव पाटील आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नगरच्या हॉटेल व्यवसायात स्वाद व दर्जेदार खाद्याची सेवा 18 वर्षापासून गणराज ग्रुप देत आहे. या हॉटेल उद्योग समुहाने नगरकरांसह राज्यातील खवय्यांच्या जीभेवर अधिराज्य गाजवले आहे. काही तरी नवीन खाद्य देण्याची नेहमीच त्यांची धडपड असते. त्यांनी सुरु केलेली राजस्थानी गुजराती थाळीला देखील चांगला प्रतिसाद मिळणार असून, चोखंदळ ग्राहकांना दर्जेदार खाद्य पसंतीस उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आमदार निलेश लंके म्हणाले की, मोठ्या शहराप्रमाणे वीक एंडची पध्दत नगरमध्ये रुळत आहे. रविवारी अनेक हॉटेलमध्ये कुटुंबीयांची गर्दी होत असते. तर केडगाव बायपास येथे बाहेरगावी जाणार्या-येणार्यांना हॉटेल कृष्ण चैतन्यच्या माध्यमातून उत्तम स्वादिष्ट व्हेज खाद्य मिळणार आहे. हॉटेलमध्ये नफ्यापेक्षा दर्जाला महत्त्व देऊन सेवा दिल्यास या व्यवसायाची भरभराट निश्‍चित आहे. गणराज ग्रुपने मागील 18 वर्षापासून हॉटेल व्यवसायात दर्जेदार व स्वादिष्ट सेवा देऊन मोठा विश्‍वास निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात पै. राजकुमार आघाव पाटील म्हणाले की, नगर-मनमाड रोड, नांदगाव शिंगवे येथे हॉटेल गणराज व शहरात पाईपलाईनरोड वर हॉटेल वडा कोंबडाच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षापासून गणराज ग्रुप नगरकरांना दर्जेदार, स्वच्छ, स्वादिष्ट व्हेज खाद्यसेवा पुरवित आहे. दर्जेदार सेवा देत असताना हॉटेल नगरकरांच्या पसंतीस उतरले. तोच स्वाद आणि सेवा घेऊन नगरकरांना नवीन खाद्य देण्याच्या उद्दीष्टाने हॉटेल कृष्णचैतन्यची सुरुवात करण्यात आली आहे. विविध व्हेज खाद्यासह 199 रुपयांमध्ये राजस्थानी गुजराती अनलिमिटेड थाळी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नितीन मोकळ यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन आभार मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून हॉटेलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *