आठरे पाटील स्कूल, श्री साई इग्लिश मिडीयम, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल संघ विजयी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. सोमवारी (दि.17 जुलै) झालेल्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील स्कूल, श्री साई इग्लिश मिडीयम, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलचे संघ विजयी ठरले.
सकाळच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात झालेल्या आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ओएसिस स्कूल सामना शेवट पर्यंत 0-0 गोलने अनिर्णित राहिला. तर 14 वर्ष वयोगटात भाऊसाहेब फिरोदिया विरुध्द श्री साई इग्लिश मिडीयम स्कूलचा अटीतटीचा सामना रंगला होता. 3-3 गोलने हा सामना देखील अनिर्णित राहिला. 12 वर्ष वयोगटात तक्षिला स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलच्या सामन्यात आठरे पाटीलने 3-0 गोलने विजय मिळवला.

दुपारच्या सत्रात 16 वर्ष वयोगटात श्री साई इग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द भाऊसाहेब फिरोदिया यांच्यात झालेल्या सामन्यात श्री साई इग्लिश मिडीयम स्कूलने विक्रमी 17-0 गोल करुन एकहाती विजय मिळवला. 12 वर्ष वयोगटात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूल मधील सामन्यात 1-3 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघाने आयकॉनवर विजय मिळवला.
स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.