• Thu. Oct 16th, 2025

आरएमटी फिटनेसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

ByMirror

Jun 23, 2023

युवक-युवतींचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे आरएमटी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवक-युवतींनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला.


आरएमटी फिटनेसचे संचालक मनीष ठुबे म्हणाले की, आरोग्य धनसंपदा या प्रमाणे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या संपत्ती व्यसनाच्या आहारी जाऊन संपवू नका. तरुण मुलांनी व्यायामाकडे वळणे गरजेचे आहे. सकाळी रोज एक तास योगा करणे म्हणजे शरीर, मन व आत्मा शुद्धीकरण होय. योगाने आपले शरीर निरोगी व प्रसन्न राहत असल्याचे त्यांनी सांगितले.


आरएमटी फिटनेसच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस मोफत योगा घेण्यात येतो. तसेच आरोग्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. निरोगी आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर देखील राबविण्यात येत असल्याची माहिती ठुबे यांनी दिली. या योग कार्यक्रमात आरएमटी फिटनेसच्या सदस्यांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *