अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी हिंगणगाव (ता. नगर) चे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सोनवणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगर तालुका सरपंच परिषदेचे सचिव पै. नाना डोंगरे यांनी आबासाहेब सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रशेखर पिंपरकर, शिशिर देवचक्के आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, जिल्ह्यात सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच यांचे उत्तमप्रकारे संगठन होवून गाव पातळीवरील प्रश्न शासनस्तरावर सोडविण्याचे काम केले जात आहे. सरपंच परिषदेचे गावाच्या विकासात्मक वाटचालीस महत्त्वाचे योगदान सुरु आहे. सरपंच परिषद सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी सोनवणे यांची झालेली नियुक्ती अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना आबासाहेब सोनवणे म्हणाले की, सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे राज्याच्या सुकाणू समितीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील सरपंच यांचे शासनस्तराव विविध प्रश्न प्रलंबीत आहे. हे प्रश्न सुटण्यासाठी 22 मे पासून कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये सर्व सरपंच, उपसरपंच यांना सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.