• Fri. Sep 19th, 2025

अहिल्यादेवींच्या नावाचा राजकीय अजेंडा घेऊन, काहींच्या हातात झेंडे -आ. संग्राम जगताप

ByMirror

Jun 11, 2023

यशवंत सेना आणि जय मल्हार संस्थेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणार्‍यांना पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- काहींना अहिल्यादेवी अत्ताशी आठवू लागल्या आहेत. अहिल्यादेवींचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. आंम्ही मागील दहा वर्षापासून सावेडी उपनगरात अहिल्यादेवींची जयंती उत्सव साजरा करत आलो आहोत. भिस्तबाग चौकाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी चौक नाव देण्यासाठी पुढाकार घेऊन महापालिकेत ठराव घेतला व शहरात पहिल्यांदाच एका चौकाला अहिल्यादेवींचे नाव देण्याचे काम करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. सावेडी येथील माऊली सभागृहात प्रा. डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश थोरात, जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर, लक्ष्मण मतकर, रावसाहेब काळे, योगेश खेंडके, राजेंद्र तागड, इंजि. डी.आर. शेंडगे, शर्मिला नलावडे, ज्योती उनवणे, मच्छिंद्र बिडकर, डॉ. संतोष गिर्‍हे, विजय भालसिंग, आबा रणवरे, अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर, अरुण वाघमोडे, अफसर शेख, अजय जाडकर, डॉ. धीरज ससाणे, बाबासाहेब राशीनकर, विठ्ठल दातीर, प्रमिला शेळके आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, स्वतःला व्यासपीठ, ओळख नसलेले काही व्यक्ती अहिल्यादेवींच्या नावाचा राजकीय अजेंडा घेऊन, झेंडे हातात घेत आहे. मात्र त्यांनी या महान व्यक्तींचे विचार व कार्य महित असणे आवश्यक आहे. अन्यथा राजकीय अजेंडा बदलला की, त्यांचा झेंडा देखील बदलतो. महापुरुषांच्या विचाराला धरून नाही, तर अजेंड्यावर चालणारे हे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी चौकात स्वागत कमान, अहिल्यादेवींचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर संस्थेचे सर्व समाजाला बरोबर घेऊन सुरु असलेले कार्य व विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना पुरस्कार रुपाने दिलेले पाठबळाचे त्यांनी कौतुक केले.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करुन करण्यात आले. यावेळी सभागृहात अहिल्या देवीचा विजय असो!, येळकोट येळकोट जय मल्हार…च्या घोषणा देण्यात आल्या. प्रास्ताविकात अ‍ॅड. महेश शिंदे यांनी जय मल्हार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्याचे व इतर सामाजिक कार्याची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणार्‍यांना पुरस्काराने सन्मान करण्यात आला.


विजय तमनर म्हणाले की, यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे तर जय मल्हार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. कांतीलाल जाडकर म्हणाले की, समाजातील उपेक्षीत घटकांना हात देण्याचे व सामाजिक कार्य करणार्‍यांना पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. पेन्शनच्या पैश्यातील 30 टक्के कुटुंबासाठी तर 70 टक्के रक्कम समाजासाठी खर्च करत असल्याचे स्पष्ट करुन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्याची त्यांनी आढावा घेतला.

मच्छिंद्र बिडकर यांनी समाजात काम करताना राजकीय पक्ष, संघटना हे जोडे बाजूला ठेऊन धनगर म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून, धनगर समाजाचा लढा व संघर्षाची माहिती दिली.
प्रा. डॉ. लक्ष्मणराव मतकर म्हणाले की, धनगर समाज आजही उपेक्षित असून त्याला आरक्षणाची गरज आहे. यासाठी समाजाने एकवटून सातत्याने आरक्षणासाठी प्रयत्न सुरु ठेवावा. समाजाच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. कार्य कोणते व किती मोठे? यापेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची ठरते. सामाजिक भावनेने कार्य करणार्‍यांना पुरस्काराने केलेला सन्मान हा प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रवीड यांनी केले. आभार अ‍ॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक विरकर, निलम जाडकर, रंगनाथ तमनर, संदीप काळभोर, अजय जाडकर, मयूर विरकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *