अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अली अन्वर मन्यार याने वयाच्या दहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अली हा पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे.
सेवानिवृत्त आदर्श शिक्षक हबीब मन्यार यांचा नातू तर वृत्तपत्र छायाचित्रकार अन्वर मन्यार यांचा तो मुलगा आहे. उपवास केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याचे काका वृत्तछायाचित्रकार समिर मन्यार, अमित मन्यार, बॉक्सिंग प्रशिक्षक शब्बीर सिकिलकर व पोदार स्कूलचे मुख्याध्यापक मंगेश जगताप यांनी त्याचे अभिनंदन केले.