राष्ट्रीय सरचिटणीस गवळी यांनी केली नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय सेनेच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी आदिनाथ आसाराम वनारसे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी वनारसे यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिंगवे तुकाई सोसायटीचे चेअरमन राजू पाटील होंडे, छावा संघटनचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, मेजर शिवाजी वेताळ, अविनाश नवगिरे आदी उपस्थित होते.

आशाताई गवळी म्हणाल्या की, अखिल भारतीय सेना दीन-दुबळ्यांच्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. राजकारण न करता सेवाभावाने संघटनेचे कार्य सुरु आहे. राज्यभर संघटनेचा विस्तार वाढत असताना सामाजिक कार्यकर्ते जोडले जात आहे. तर वंचित घटकांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आदिनाथ वनारसे यांनी जिल्ह्यात अखिल भारतीय सेनेच्या गावोगावी शाखा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, मोठा युवा वर्ग जोडून विविध प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.