सामाजिक जाणीवेचा जागर; नृत्याचे बहारदार सादरीकरण
निबंध, वकृत्व, पथनाट्यांतून युवकांनी मांडले विचार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने व राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये निबंध, वकृत्व, चित्रकला, हस्तकला, नृत्य, पथनाट्य आदी विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. अहिल्यानगर महापालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर रोड, सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये शहरासह जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन युवक-युवतींपर्यंत सर्वांनी आपल्या कलागुणांचे व विचारांचे प्रभावी सादरीकरण करत महोत्सवात रंगत भरली.
निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर आपल्या भावना व विचार प्रभावीपणे मांडले. वकृत्व स्पर्धेतून युवकांनी सामाजिक प्रश्नांना हात घालत परिवर्तनाची दिशा सूचित केली. चित्रकला व हस्तकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. नृत्य स्पर्धेत वैयक्तिक तसेच सामूहिक नृत्यप्रकारांतून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. पथनाट्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व जनजागृतीचे संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच बचत गटातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सर्व स्पर्धकांचे स्वागत महोत्सवाचे मुख्य संयोजक व जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले. सदर स्पर्धा अनंत द्रवीड, अनिल साळवे, सचिन साळवी, ॲड. अक्षय ठोकळ, ॲड. गायत्री गुंड आदी परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
यावेळी जयश्री शिंदे, रजनी ताठे, ॲड. आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. तुषार शेंडगे, जयेश शिंदे, इसाभाई शेख, मेजर भिमराव उल्हारे, प्रा. सुनील मतकर, हेमलाता कांबळे, दिपाली उदमले, स्वाती डोमकावळे, अश्विनी वाघ, ॲड. विद्या शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे, बाळासाहेब पाटोळे, तुषार रणनवरे, मीनाताई म्हसे, निलेश रासकर, संतोष उल्हारे, कान्हू सुंबे, अक्षय ठोकळ, रमेश गाडगे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, राजकुमार चिंतामणी, प्रा. हर्षल आगळे आदी उपस्थित होते.
