दांडिया व गरबाचा उत्साह; विविध स्पर्धांनी रंगला दांडियाचा कार्यक्रम
स्नेहालय व अनामप्रेम संस्थेतील वंचित घटकातील मुला-मुलींचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच स्नेहालय व अनामप्रेम संस्थेच्या वंचित घटकातील मुला-मुलींना या उत्सवात सामावून घेत त्यांच्यासह नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक राजेश भंडारी, नयना भंडारी, तेजस गांधी, डॉ. अमोल जाधव, मालाबारचे देवेंद्र, सुविधा संतोष, सागर गुरव, शुभम कटारिया, विशाल लाहोटी, शुभम कटारिया, सागर पवार, उमेश दोडेजा, गिरीराज जाधव, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सचिव सविता काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभूषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला होता. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता. या उत्सवात सहभागी झालेल्या स्नेहालय, अनामप्रेम मधील मुला-मुलींना संस्था व तेजस गांधी यांच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

दांडिया नाईटमध्ये विविध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मिस्टर जिव्हाळा- यश लोढा, मिस जिव्हाळा- अश्विनी सोनी, बेस्ट सोलो डान्सर (पुरुष व महिला)- गुनाली मुथा, माहीर नागपाल, बेस्ट कपल डान्स- वैष्णवी व सार्थक, बेस्ट ड्रेसअप कपल- समीर व सोनाली बोरा, बेस्ट ग्रुप डान्स प्रथम- अजिंक्य डान्स स्टुडिओ फिटनेस, द्वितीय- जेजेडी ग्रुप, किड्स बेस्ट ग्रुप डान्स- ग्लोविंग स्टार्स, बेस्ट लेडीज कपल- वैधी बोरा, पूजा चंगेडिया, बेस्ट किड्स- द्रोवीत पाटील, बेस्ट ड्रेसिंग किड्स- जिया जग्गड, कार्तिक चंगेडिया, भूमी पोखरणा यांनी बक्षीसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना सोने व चांदीचे आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आली. तर 5 भाग्यवान विजेत्यांना सोडतद्वारे मलाबार गोल्डच्या वतीने सोन्याचे नाणी बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण प्रिया नागपाल व ज्योती शाह यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळाच्या ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
