आमच्या पूर्वजांची जागेची सनद असल्याचा सय्यद यांचा खुलासा;
न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीत भोसले आखाडा येथील शिल्पा गार्डन ते बुरुडगाव रोड दरम्यानच्या साडेबारा एकर भूखंड सत्तेचाळीस वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र बुऱ्हाण बाबुमिया सय्यद व जावेद बुऱ्हाण सय्यद यांनी या जागेवर आपल्या पुर्वजांचा दावा करुन या जमीनीची सन 1886 पूर्वी पासूनची सनद (कैफियत) स्वत: जवळ असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इनामी वर्ग दोन चा एक मध्ये वर्ग करुन न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
शहरात चर्चेचा विषय राहिलेला या भूखंडाला तिसरेच वळण मिळाले असून, सय्यद यांनी मालमत्ताधारकांनी स्वत:ला मुळ मालक सांगणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करु नये. या भूखंडाबाबत पुराव्यानिशी न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या जागेच्या प्रकरणात 300 मालमत्ता धोक्यात आलेले असताना आनखी गुंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
1977 पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या भूखंडाचा निकाल नुकताच लागलेला आहे. जागेचे वाटप करण्यासाठी ओपन स्पेस, रस्त्याची हद्द निश्चित करुन येथील काही रहिवासींना जागा खाली करण्याचा नोटिसा देण्यात आले आहे. सय्यद यांनी सदर भूखंडाबाबत लॅण्ड इलिगेशनला जात इनामची नोंद आहे. सन 1909 पर्यंत टिप्पन बुक मध्ये खातेदार म्हणून आमचे पूर्वज मिया भाई व मदन भाई यांची नोंद असल्याचे म्हंटले आहे.
सन 1916 सालापासून वाटणी पत्रामुळे पोट हिस्से तयार झाले आहे. त्यामध्ये हस्तांतर झाले कसे व कोणी दिलेली आहे? ते आढळून येत नाही. त्यांनी कब्जेदार म्हणून वेगवेगळी फाळणी वाटणी पत्र तयार केलेले आहे. लॅण्ड इलिगेशनमुळे सिद्ध होत आहे की, ही जमीन इनाम वर्ग दोन आहे. आमच्या वडिलोपार्जित पासून आम्हाला सनद (कैफियत) आहे. सदरच्या गट नंबर मध्ये सरकारी नजराना भरल्याची कुठलीही नोंद आढळत नाही व जिल्हाधिकारी यांच्या तोंडी आदेशाने 1954 साली वर्ग दोन ची जमीन वर्ग एक मध्ये खालसा झाली आहे. 1886 ते 1909 पर्यंत खातेदार आमचे पूर्वज आहे. आमच्या जमिनीवरील कसबदार यांनी कब्जादार म्हणून नोंद घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर कसबदारचे वारसांची नोंद जमिनीवर वारसदार म्हणून केला असल्याचा खुलासा सय्यद यांच्या वतीने करण्यात आला आहे. तर हे प्रकरण न्यायालयात दाखल करुन न्याय मागितला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.