• Sun. Mar 1st, 2026

आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी साजरा होणार जागतिक आदिवासी दिवस

ByMirror

Aug 8, 2025

सावेडीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीचे आयोजन


विविध उपक्रमांचा समावेश; समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) अहिल्यानगर शहरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सावेडी येथे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आदिवासी नृत्यप्रस्तुती, मार्गदर्शन सत्रे आणि आदिवासी बालकलाकार व गुणवंतांचा सत्कार असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


सकाळी 9 वाजता सावेडी येथील प्रोफेसर चौकातून रॅलीला प्रारंभ होणार आहे. रॅलीदरम्यान पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या कलाकारांकडून आदिवासी नृत्य सादर केले जाईल, ज्यातून समृद्ध आदिवासी परंपरेची झलक पहायला मिळेल. रॅलीनंतरचा मुख्य कार्यक्रम श्रेयस लॉन, भिस्तबाग महालाजवळ पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्त सपना वसावा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून जल, जंगल, जमीन हे आदिवासींचे मूळ हक्क या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच प्रभाग अधिकारी एस.बी. तडवी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.


या प्रसंगी आदिवासी बालकलाकार तसेच आदिवासी वसतिगृहातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव परिश्रम घेत असून, सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *