महिलांच्या आरोग्यासाठी प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
स्त्री म्हणजे सृजनाची मूळ शक्ती; तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून -डॉ. जगदीश भराडिया
नगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने आयोजित चाळीशीनंतर महिलांचे आरोग्य या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक स्वास्थ्य, नेत्रसंबंधी काळजी, तसेच मनोरंजनात्मक आणि बौद्धिक विकासासाठीही या कार्यक्रमात विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगदीश भराडिया, डॉ. नेहा भराडिया, सुनिता भगवान फुलसौंदर, एकता कदम, उद्योजक कृष्णा जाधव, विशाल कुटे, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, अध्यक्षा रजनी भंडारी, उपाध्यक्ष उषा सोनी, सल्लागार विद्या बडवे, सचिव ज्योती कानडे, रेखा फिरोदिया, मेघना मुनोत, उज्वला बोगावत, सोनी पुरनाळे, अर्चना बोरुडे, हिरा शहापुरे, उषा सोनटक्के, अरुणा गोयल, शकुंतला जाधव, वंदना गारुडकर, शशिकला झरेकर, अलका वाघ, सुजाता कदम, सुनिता काळे, आशा गायकवाड, लीला अग्रवाल, सुरेखा जंगम, ज्योती गांधी, जयश्री पुरोहित, सुजाता पुजारी, रेखा मैड, हेमा पडोळे, आरती थोरात आदी उपस्थित होत्या.
डॉ. जगदीश भराडिया यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्री ही सृजनाची मूळ शक्ती असून तिच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याचे भवितव्य अवलंबून असते. बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहारातील बिघाड यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर डॉ. नेहा भराडिया यांनी डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे सांगत मोतीबिंदूसारख्या आजारांची माहिती दिली. वय वाढल्यावर डोळ्यांची नियमित तपासणी करून योग्य वेळी उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना अलका मुंदडा यांनी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी महिलांसाठी विविध बौद्धिक आणि मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी विविध खेळांचा आनंद लुटला. विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. मेघना मुनोत यांनी विविध खेळ घेतले. कुंश मसाले यांच्या वतीने महिलांना मोफत मसाले वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार ज्योती कानडे यांनी मानले.