• Sat. Jan 31st, 2026

जिल्हा न्यायालयात महिला वकीलांचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात

ByMirror

Jan 31, 2026

बालविवाहमुक्त अहिल्यानगरसाठी महिला वकील व पोलीस अधिकाऱ्यांचा निर्धार -ॲड. अनुराधा येवले


महिला वकील व पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली बालविवाहमुक्त जिल्ह्याची शपथ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात महिला वकीलांचा पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेत पार पडला. या सोहळ्यात उपस्थित सर्व महिला वकील व पोलीस अधिकारी यांनी “बालविवाह मुक्त भारत घडविणे” या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प करत शपथ घेतली.


हा उपक्रम बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा दिनेश येवले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील सर्व महिला वकील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वंदना फाटके पाटील-जगताप उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव, ॲड. स्वाती पाटील, ॲड. जया पाटोळे, ॲड. मनीषा केळगंद्रे, ॲड. मनीषा डूबे पाटील, ॲड. सुजाता कोठारी, ॲड. बागेश्री जरंडिकर, महिला सचिव ॲड. सारिका झरेकर, कार्यकारणी सदस्य ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. सुजाता पंडित, ॲड. निरू काकडे, ॲड. कुंदा दांगट, ॲड. शिल्पा शेळके, ॲड. रूपाली पठारे, ॲड. पल्लवी होनराव आदी मान्यवर उपस्थित होत्या.


या सोहळ्यात ॲड. अनिता दिघे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. भक्ती शिरसाट, ॲड. अर्पिता झरेकर, ॲड. मनीषा पंडुरे, ॲड. आशा गोंधळे, ॲड. सुचेता कुलकर्णी, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. सुनिता गोरडे, ॲड. रिजवाना शेख, ॲड. करुणा शिंदे, ॲड. यास्मिन शेख आदी महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन तसेच भिंगार पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ॲड. अनुराधा येवले म्हणाल्या की, न्यायालयात कार्यरत महिला वकील कामाच्या व्यापात इतक्या व्यस्त असतात की, एकमेकींशी संवाद साधण्याची संधीही मिळत नाही. अशा कार्यक्रमांमुळे महिला वकील एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात. न्यायिक क्षेत्रात महिला वकील प्रामाणिकपणे कार्य करत असून उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. बालविवाहमुक्त अहिल्यानगरसाठी महिला वकील व पोलीस अधिकाऱ्यांचा निर्धार करण्यात आला आहे. महिला वकीलांचा हळदी-कुंकूचा उपक्रम मागील 15 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.


सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात म्हणाल्या की, समाजात बदल घडविण्यासाठी कायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच सामाजिक संवेदनशीलतेचे योगदानही आवश्‍यक आहे. बालविवाह ही केवळ कायद्याचीच नव्हे तर समाजाचीही गंभीर समस्या आहे. आज महिला वकील आणि पोलीस अधिकारी एकत्र येऊन बालविवाहमुक्त जिल्ह्याचा संकल्प करीत आहोत, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना समाजप्रबोधनही तितकेच आवश्‍यक आहे. महिला वकील या समाजाच्या पायाभूत बदलासाठी प्रभावी भूमिका बजावत असून पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे. अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आपण सर्वजण मिळून नक्कीच यशस्वी होऊ, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


डॉ. वंदना फाटके पाटील-जगताप म्हणाल्या की, आजचा हळदी-कुंकूचा सोहळा हा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता आरोग्याबाबत जागृतीचा सोहळा साजरा होणे आवश्‍यक आहे. महिला ही कुटुंबाची महत्त्वाची घटक असते. तिचे आरोग्य चांगले असल्याचे कुटुंबाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. महिला वकीलांसाठी अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून शिबिर घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमासाठी महिला वकील प्रिया खरात, सुरेखा भोसले, अनुजा काटे, सारिका खाकाळ, सविता साठे, मीनाक्षी कराळे, संगीता पाडळे, कौन्सिलर संगीता सुसर, रुबीना पठाण, मुबीना जहागीरदार, प्रज्ञा उजागरे, विमल खेडकर, भावना पालीकुंडवार, दीक्षा बनसोडे, मोनाली कराळे, अर्चना राऊत, पल्लवी गीते, गिरीजा गांधी, मीना भालेराव, सुजाता कुमार, ज्योती ठुबे, सोनल वेलदे, ज्योती हिमणे, काकडे, सुविद्या तांबोळी, मीना शुक्रे, लता गांधी, शितल दुसुंगे, अरुंधती कांबळे, मनीषा जाधव, गौरी सामलेटी, ज्योत्सना ससाने, स्नेहल लोखंडे, शिल्पा राजपूत, पल्लवी बारटक्के, शकुंतला मोरे, पुरी मॅडम आदींसह मोठ्या संख्येने महिला वकील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार ॲड. अरुणा राशिनकर यांनी मानले. यावेळी महिलांना दैनंदिन जीवनात उपयुक्त असे वाण देण्यात आले तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” असा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *