पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रेया ओला यांनी केले महिलांच्या विविध कलागुणांचे कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटून विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. तर पाढऱ्या रंगाच्या थिमवर झालेल्या पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.

केडगाव येथील ब्रेक ॲण्ड टेक हॉटेल मध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रेया राकेश ओला उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या कलागुणांचे कौतुक करुन कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तर वेशभुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण केले. यावेळी डॉ. मिनाक्षी करडे, दादी-नानी ग्रपच्या अध्यक्षा जयताई गायकवाड, वंदना गारुडकर, ज्योती विधाते, प्रयासच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, अनिता काळे, विद्या बडवे, कविता दरंदले, छाया राजपुत, माया कोल्हे, ज्योती कानडे, सविता गांधी, ॲड. ज्योत्सना कुलकर्णी, मनिषा देवकर, उषा सोनी, इंदू गोडसे, कुसुमसिंग, जयश्री पुरोहित, उज्वला बोगावत, साधना भळगट, शकुंतला जाधव, सुजाता पुजारी, निलिमा औटी, प्रतिभा भिसे, मेघना मुनोत आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी निता शेट्टी यांची गीतांची सुरेल मैफल रंगली होती. शेट्टी यांनी सादर केलेल्या विविध गीतांचा महिलांनी आनंद घेतला. तर रास-गरबा नृत्याचा आनंद घेऊन विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात अलकताई मुंदडा यांनी महिलांसाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत जयाताई गायकवाड व दिप्ती मुंदडा यांनी केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी बौध्दिक, प्रश्नमंजुषा, तंबोला आदी मनोरंजनात्मक खेळाच्या स्पर्धेत महिला सहभागी झाल्या होत्या.

डॉ. मिनाक्षी करडे म्हणाल्या की, सण-उत्सवात महिलांनी एकत्र येऊन आनंद घेतल्यास विचारांची देवाण-घेवाण होत असते. सखी एकमेकिंच्या सुख-दु:खात समरस होतात. महिला सर्व कुटुंबीयांना आनंद देत असताना, स्वत:साठी वेळ देऊन जीवनाचा आनंद घ्यावा. महिलांनी महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद स्पष्ट करुन महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले.
पारंपारिक वेशभुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक- अलका कांबळे, द्वितीय- माधवी गोरे, तृतीय- दिपा मालू, उत्तेजनार्थ दिपाली लखारा, सोनल लखारा यांनी बक्षस पटकाविले. तर तंबोला व बौध्दिक स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सलोनी मुंदडा यांनी केले. आभार ज्योती कानडे यांनी मानले.