ॲड. संजय जव्हेरी यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार; कारवाईची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये थंड पाण्याचे जार विक्री करणारे विक्रेते हे पाणी थंड करण्याकरिता फॉर्मलीन या केमिकलचा सर्रास वापर करत आहेत. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने होणारी ही हेळसांड त्वरित थांबावी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या समधीत पाणी जार विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय जव्हेरी यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकारात मुंढे यांच्याकडे ईमेलव्दारे निवेदन पाठवून तक्रार केली आहे.
अहिल्यानगर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स तसेच शहरातील विविध ठिकाणच्या खाद्य पदार्थांच्या गाड्या तसेच शाळा परिसरातील खाद्य विक्री ठिकाणी इत्यांदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी या जारचा उपयोग केला जातो. शाळेत जाणारी मुले तसेच अडाणी जनता ही थंड पाणी म्हणून हे जारचे पाणी पित असतात. पाणी थंड करण्यासाठी मात्र फॉर्मलीन या विषारी केमिकलचा वापर केला जातो. याबाबत जनतेत जनजागृती नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जातात आहे. ही बाब धोकादायक असून, आयुक्त मुंढे यांनी स्वतः आरोग्याशी खेळणाऱ्या या भयंकर विषारी समसयेकडे लक्ष द्यावे अशी मागणी ॲड. संजय जव्हेरी यांनी केली आहे.

