• Wed. Jan 15th, 2025

श्रीराम चौकात गटई स्टॉल फलकाचे अनावरण

ByMirror

Sep 2, 2024

गटई कामाचे नवीन दर पत्रक जाहीर

शेवटच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे चर्मकार विकास संघाचे कार्य प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पीच परवाना धारक गटई कामगार बांधवाच्या गटई स्टॉल फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, चर्मकार विकास संघ समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करुन समाजकार्य करीत आहे. शेवटच्या घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य प्रेरणादायी असून, या सामाजिक कार्यामुळे राज्यातील समाज बांधव या संघटनेशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.


संजय खामकर म्हणाले की, चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने शहर व उपनगरातील गटई कामगारांच्या पीच परवान्याचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. विविध ठिकाणी गटई कामगारांना स्टॉल मिळाले असून, या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. एवढ्यावर न थांबता, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


चर्मकार विकास संघाचे जेष्ठ नेते पाराजी साळे यांचे गटई स्टॉल असलेल्या स्टॉलच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तर गटई कामाच्या नवीन दर पत्रकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सर्जेराव गायकवाड, अरुण गाडेकर, दिनेश देवरे, गिरीश केदारे, ज्ञानेश्‍वर म्हैसमाळे, माणिक नवसुपे, स्वप्निल खामकर, डॉ. सचिन साळे, संदीप सोनवणे, संतोष कदम, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, महेश काजळकर, गजानन बागडे, ज्ञानेश्‍वर पाखरे, भिकाजी वाघ, दिलीप तावरे, किसन बागडे, ज्ञानेश्‍वर वाघमारे आदींसह गटई आघाडीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *