निमगाव वाघा ग्रामस्थांचा निर्णय; गावाच्या प्रवेशद्वारात झळकले फलक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे. गावाच्या प्रवेशद्वारासह गावातील मुख्य चौकात राजकीय नेत्यांच्या गावबंदीचे फलक लावण्यात आले. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष व एक मराठा लाख मराठा… घोषणांनी गावातील परिसर दणाणून निघाला. ग्रामस्थांनी निदर्शने करुन तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नगर तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दुध डेअरीचे चेरमन गोकुळ जाधव, अजय ठाणगे, गणेश कापसे, पिंटू जाधव, सचिन जाधव, संजय कापसे, अनिल डोंगरे, गोरख निमसे, संजय फलके, निलेश कापसे, सुनिल जाधव, सागर कापसे, दत्ता फलके, सतीश फलके, बापू कापसे, शिवाजी जाधव, अर्जुन पवार, नाना जाधव, विश्वनाथ गायकवाड, सुरेश जाधव, अशोक कापसे, संजय कापसे, विजय गायकवाड, जगन्नाथ जाधव, मेजर शिवाजी पुंड, सुनिल कापसे, ज्ञानदेव कापसे, संतोष डोंगरे, अतुल फलके, अरुण कापसे, दत्तू फलके, सतीश फलके, जालिंदर आतकर, आदिनाथ फलके, बापू फलके, प्रमोद जाधव, किरण जाधव, दिपक गायकवाड, उज्वला कापसे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची वाताहात झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या समाजाच्या व्यथा कोणत्याही सरकारने ऐकून घेतली नाही. त्यामुळे समाजाला पेटून उठण्याची वेळ आली. त्यामुळे या समाजातील मुलांचे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आत्महत्या थांबून या समाजातील दुर्लक्षीत राहिलेला घटक प्रवाहात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
