• Mon. Jan 26th, 2026

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन महात्मा फुले यांना अभिवादन

ByMirror

Apr 13, 2024

महात्मा फुले यांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली -सुनिल सकट

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नालेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. बहुजन समाजाच्या घराघरात ज्ञानाची गंगा पोहचविणारे महात्मा फुले यांना या उपक्रमातून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले.


पुजाताई दातरंगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी देवेश नांगरे, सोनाक्षी नांगरे, श्रद्धा बर्वे, रुतुजा नट, साक्षी साळी, प्रदीप साळी, श्रावण नट, रवी गुप्ता, सर्वन गुप्ता, अभिराज दातरंगे, तन्वी उबाळे, साजरी कोरडे, समृद्धी, प्रतिक, अश्‍विनी, सरिता अष्टेकर, विद्या दिनकर, मंदा सकट, आरती सकट, पूजा सकट, विजय बर्वे, रंजना बर्वे, बडवे, भक्ती बर्वे, मधुकर अष्टेकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


सुनिल सकट म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य समाजाला दिशा देणारे असून, फुले दांपत्याने स्त्रियांच्या जीवनातील अंधकार प्रकाशरुपी शिक्षणाने दूर केला. महिला सक्षमीकरणाची पायाभरणी त्यांनी केली. फुले दांम्पत्यामुळे आजची महिला शिक्षणाने सर्व क्षेत्रात सक्षम झाली आहे. आयुष्यभर संघर्ष करून महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा मोडीत काढून समाज जागृतीचे कार्य केले. त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *