• Sat. Aug 30th, 2025

स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त यशवंतनगरला वृक्षारोपण

ByMirror

Aug 13, 2025

वृक्षारोपणातून आदरांजली अर्पण

नगर (प्रतिनिधी)- सहकार चळवळीचे जनक, पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस तसेच राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनिल सकट यांच्या पुढाकाराने भिंगार उपनगराजवळील यशवंतनगर परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली.


या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी अंजना ढोबळे, अर्चना पुलावळे, अंजली ढोबळे, मंगल आळकुटे, नंदा पाचारणे, मयुरी आळकुटे, आरती सकट, सोनाली आळकुटे, गणेश ढोबळे, सुरज ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


सुनिल सकट यांनी सर्व उपस्थितांना वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. सकट म्हणाले की, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आयुष्यभर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून आपण त्यांना खरी आदरांजली वाहत आहोत.

आपण झाडे लावतो, पण त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. आज आपण इथे लावलेली झाडे केवळ आपल्यासाठी नाहीत, तर पुढील पिढ्यांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर झाडे लावा, झाडे जपा हा संदेश देत त्यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाजसेवा व सहकार कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *