हरदिन मॉर्निंग ग्रुपने निरोगी आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला गती दिली -नितीन शिंगवी
नगर (प्रतिनिधी)- ज्याचे स्वास्थ्य चांगले, तो सर्वसंपन्न व्यक्ती होय. जीवन निरोगी असल्यास जीवनाचा आनंद घेता येतो. हरदिन मॉर्निंग ग्रुपने निरोगी आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्याचे काम केले. ग्रुपच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा उद्योजक नितीन शिंगवी यांनी केले.
भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाप्रसंगी उद्योजक शिंगवी बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए किरण भंडारी, नरेंद्र बाफना, सचिन कटारिया, मनोज रांका, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, शशिकांत घिगे, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुधीर कपाळे, दिलीप गुगळे, अशोक पराते, शिरीष पोटे, दीपक बडदे, सुभाष पेंढुरकर, अभिजीत सपकाळ, संजय भिंगारदिवे, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, विठ्ठलनाना राहींज, दीपक अमृत, विशाल भामरे, मुन्ना वाघस्कर, शेषराव पालवे, किरण फुलारी, राजू कांबळे, कोंडीराम वाघस्कर, दिनेश शहापूरकर, कुमार धतुरे, सूर्यकांत कटोरे, सुहास देवराईकर, सुदाम गांधले, विकास निमसे, रामनाथ गर्जे, योगेश चौधरी, प्रमोद सोळंकी, प्रज्योत सागू, नामदेवराव जावळे आदींसह हरदिनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य चळवळीसह वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविण्यात येते. तसेच ग्रुप मधील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस देखील वृक्षारोपणाने साजरा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
सीए किरण भंडारी म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपने भिंगारमध्ये निरोगी आरोग्याचा पाया रचला. मागील 25 वर्षापासून हे कार्य सतत अविरतपणे सुरू असून, पर्यावरणासाठी त्यांचे सुरू असलेले वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र बाफना यांनी सर्वांचे जीवन आनंदी व निरोगी करण्यासाठी हरदिनचे कार्य प्रेरणादायी आहे. ग्रुपच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील व्यक्ती जोडले गेले असून, एक कौटुंबिक वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सचिन कटारिया यांनी पर्यावरण संवर्धनासाठी व सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित पाहुण्यांना ग्रुपची स्मरणिका भेट देऊन सत्कार करण्यात आला.