• Mon. Nov 3rd, 2025

घटस्थापनेनिमित्त निंबळकला रंगली देवीची पारंपारिक मिरवणुक

ByMirror

Oct 4, 2024

टाळ-मृदंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांसह महिलांचा सहभाग

मुलींनी सादर केले मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त निंबळक (ता. नगर) येथे पांडुरंग मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक पध्दतीने देवीची मिरवणुक काढून घटस्थापना करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या मिरवणुकीने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले. महिला मंडळी पिवळ्या व भगव्या साड्या परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.


निंबळक नवरात्र उत्सवाचे आयोजक व शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा ज्योतीष तज्ञ संतोष घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती मंदिर येथून मिरवणूकाला प्रारंभ झाले. यावेळी महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता. पिंपळगाव कौडा (ता. नगर) येथील विरजानंन्द कन्या गुरूकुलच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन मर्दानी खेळाच्या धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.देवीची मिरवणुक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


संतोष घोलप पुढाकार घेऊन दरवर्षी गावात नवरात्र उत्सव साजरा करत असतात. गावातील सर्व जाती-धर्माच्या व प्रत्येक आडनावाच्या सर्व कुटुंबांना एक दिवस आरतीचा मान दिला जातो. गावातील सेवा संस्था व ग्रामपंचायत सदस्य व इतर लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांना निमंत्रित केले जाते. सर्व राजकीय व सामाजिक मतभेद दूर करून गावच्या नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे.



सप्तगंगेचे जल असणारा सप्तमीचा पवित्र आरती कलशचा मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनीयाताई गोरे यांना देण्यात येणार आहे. निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन दरवर्षी पवित्र कलशचा मान विविध क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो.
–—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *