अहमदनगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमेला या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी (दि.28 ऑक्टोबर) रात्री झाले. अहमदनगर शहरातून मध्यरात्री हा अद्भुत नजारा खगोल प्रेमींना पहावयास मिळाला.
चंद्रग्रहण रात्री 1:05 वाजता सुरू झाले आणि पहाटे 2:24 वाजता संपले. भारतात चंद्रग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव 1:44 वाजता दिसून आला. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतासह इतर अनेक देशांमध्ये दिसले. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, हिंद महासागर, अटलांटिक, दक्षिण प्रशांत महासागर, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्येही दिसले.

चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू झाला होता आणि या काळात अनेक शुभ कार्यांसह शास्त्रात निषिद्ध आहे. शास्त्रानुसार सर्व गोष्टी महिला व भाविक या गोष्टी पाळताना दिसून आले. तर खगोल प्रेमींनी रात्र जागून या ग्रहणाचा नजारा पाहण्याचा आनंद लुटला.
