सेंट जॉन्स चर्चचे आयोजन; खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या वतीने ॲलेक्स चषक 2024 फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि.9 मार्च) व रविवारी (10 मार्च) दोन दिवस चर्चच्या मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेत फुटबॉल संघांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फाईव्ह ए साईड प्रकारात ही फुटबॉल टूर्नामेंट होणार आहे. शनिवारी स्पर्धेचे उद्घाटन होवून नॉक आऊट पध्दतीने सलग सामने खेळविण्यात येणार आहे. दोन दिवस फुटबॉलचा थरार रंगणार असून, फुटबॉल प्रेमींना व खेळाडूंना एक पर्वणी मिळणार आहे. 8 मार्च पर्यंत फुटबॉल संघांना नाव नोंदणी करुन सहभाग नोंदविता येणार आहे. विजेत्या संघास चषक 5 हजार रु. तसेच उपविजेत्या संघाला चषक आणि 3 हजार रु. चे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती चर्चचे सचिव फादर विश्वास परेरा यांनी दिली.
या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप अलेक्स फर्नांडिस यांनी शुभेच्छा दिल्या. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी विक्टर जोसेफ 9860108008, जेव्हिअर स्वामी 9665697847 व खालील सय्यद 8275741020 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.