• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

ByMirror

May 13, 2024

तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन केले मतदान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पाडत असून, नगर शहरातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत सोमवारी (दि.13 मे) मतदानाचा हक्क बजावला.


नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना सर्व तृतीयपंथीयांनी एकत्र येत तारकपूर येथील सेंट सेव्हिअर स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

शहरातील सर्व तृतीय पंथीयांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी तृतीय पंथीयांचे अध्यक्ष काजल गुरु यांनी पुढाकार घेतला होता. मोठ्या प्रमाणात मतदानासाठी एकत्र आलेल्या तृतीयपंथीयांनी सर्वांचे लक्ष वेधले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *