बाबुर्डी येथे प्रचार सभेत आरोप
पारनेर सैनिक बँक निवडणुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक निवडणुकीत बँक सभासदांनी बँकेत केलेला व्यवहारेचां गैरव्यवहार ओळखला असून, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना मतदार बळी पडणार नसल्याचे प्रतिपादन परिवर्तन पॅनलचे उमेदवार दत्तात्रय भुजबळ यांनी केले.
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबुर्डी येथे परिवर्तन पॅनलच्या प्रचाराप्रसंगी भुजबळ बोलत होते. यावेळी सैनिक बँक माजी चेअरमन सुभाष ठुबे, विक्रमसिंह कळमकर, माजी व्हाईस चेअरमन किसन (नाना) ठुबे, बाबासाहेब गवळी, बँकेचे सभासद रामदास गवळी, संतोष दिवटे, रमेश दिवटे, बापू दिवटे, राजू गाडगे, प्रकाश पिसे, सुरेश काकडे, भाऊसाहेब गवळी, बाबू गवळी, वामन बारवकर, भरत दिवटे, बाळासाहेब दिवटे, बाळासाहेब गारकर, अमृत कदम, सखाराम बारवकर, ज्ञानदेव दिवटे, प्रकाश दिवटे, सचिन वाबळे, सुभाष वाबळे, किरण नगरे, उमेश नगरे, भाऊसाहेब देंडगे,
ताराचंद करंजुले उपस्थित होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, व्यवहारे यांनी मागील निवडणुकीत जो वचन नामा दिला होता, त्या वचननाम्यातील एकतरी मुद्दा पाळला का? बँकेत भ्रष्ट कारभार केल्याने 5 गुन्हे दाखल झाले. संजय गांधी निराधार योजनेत गरिबांचे पैसे खाणाऱ्याला पाठीशी घातले. ते प्रकरण थांबते नाही, तोच त्याच कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपयांचा चेक घोटाळा झाला. याला जबाबदार चेअरमन शिवाजी व्यवहारे असल्याची टीका भुजबळ यांनी केली.