• Wed. Jul 2nd, 2025

नैसर्गिक रित्या आंबा पिकवून उच्चांकी भाव मिळवणाऱ्या शेतकऱ्याचा गौरव

ByMirror

May 11, 2024

दीडशे एकर शेतीत 23 हजार केशर आंब्याच्या झाडातून विक्रमी उत्पादन

आरोग्याच्या दृष्टीकोनाने नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांना अधिक मागणी -कदीर बागवान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक रित्या सर्वोत्तम हापूस आंबा पिकवून बाजार समितीमध्ये उच्चांकी भाव मिळवणाऱ्या आंबा उत्पादक शेतकरीचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गौरव करण्यात आला. भाळवणी (ता. पारनेर) येथील रामदेव दगडू पवार यांच्या शेतात प्रगतशील शेतकरी सुधाकर कारभारी ताके यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावे विक्रमी उत्पादन घेऊन उचांकी भाव मिळवला. ताके यांचा आडत व्यापारी सिकंदर रहेमान बागवान फ्रुट मर्चंट यांच्या वतीने कदीर सिकंदर बागवान यांनी सत्कार केला. यावेळी रामदास ढवळे, राजीक बागवान आदी उपस्थित होते.


अक्षय तृतीयानिमित्त मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये आंब्याची आवक झाली. मात्र रामदेव दगडू पवार यांच्या शेतात ताके यांनी नैसर्गिक रित्या आंब्याचे विक्रमी उत्पादन केले. दीडशे एकर शेतीत 23 हजार केशर आंब्याचे झाडे आहेत. नैसर्गिक रित्या झाडांची लागवड करुन नैसर्गिकरित्या पिकविण्यात आलेले आहे. बाजारात आंबे आले असताना त्याला प्रति किलो 140 रुपये किलोचा भाव मिळाला. तर काही मिनीटातच शंभर कॅरेट विक्रीस गेले.


पूर्णत: नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले आंबे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, मोठ्या प्रमाणात या आंब्यांना मागणी असल्याचे ताके यांनी सांगितले. कदीर सिकंदर बागवान म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी नैसर्गिक पद्धतीने गुजरातच्या केशर आंब्यापेक्षाही अधिक दर्जेदार पध्दतीचे आंबे पिकवत आहे. हायब्रीडच्या युगात केमिकलचा अतिवापर करुन फळे पिकवले जात असताना ते आरोग्याला घातक ठरत आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनाने नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांना अधिक मागणी आहे. नैसर्गिक रित्या पिकवलेल्या आंब्याने भाव खाल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *