• Wed. Mar 12th, 2025

परिवर्तन पॅनलच्या उमेदवारानी अण्णासाहेब हजारे यांचा आशीर्वाद घेऊन केला प्रचाराला प्रारंभ

ByMirror

Feb 4, 2024

सैनिक बँक निवडणूक

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी पॅनल प्रमुख दत्तात्रेय भुजबळ, आनंदा रणदिवे, विनायक गोस्वामी, संतोष राक्षे, निलेश तनपुरे, दीपक गायकवाड, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, अरुण रोहकले, लक्ष्मण डोके, सुरेश लेकुरवाळे, पिंपरी जलसेन, माजी सरपंच लहू थोरात आदे उपस्थित होते.


यावेळी आण्णासाहेब हजारे म्हणाले की, सैनिक बँक ही माजी सैनिकांनी स्थापन केली असून बँकेची बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती. परंतु लोकशाहीत सर्वांना अधिकार असल्याने काही जागा बिनविरोध झाल्या नसल्या तरी उर्वरित संचालक पदासाठी स्वच्छ प्रतिमा असलेले लोक संचालक म्हणून बँकेत जाणे गरजेचे असल्याचे मत आण्णा हजारे यांनी व्यक्त केली.


यावेळी परिवर्तन पॅनल प्रमुख दत्तात्रय भुजबळ म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य उमेदवार असून आमचा विरोधी पॅनलचे प्रमुख शिवाजी व्यवहारे यांनी बँकेत चालवलेली हुकमशाही मोडीत काढण्यासाठी आरक्षित जागेवर आम्ही उमेदवाऱ्या केल्या आहेत. जनरल सर्वसाधारण जागे बाबत आमचा विरोध नव्हताच. त्यामुळे नेते मंडळींनी केलेल्या आव्हानाला आम्हीही साथ दिली. मात्र आरक्षित जागेबाबत सत्ताधारी पॅनल प्रमुखाने आडमुठी भूमिका स्वीकारली परिणामी आम्हालाही त्यांच्या विरोधात उभे राहणे भाग पडले असल्याचे स्पष्टीकरण दिले. विमान चिन्हावर परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *