• Wed. Nov 5th, 2025

फसवणुक व एमपीआयडी मधील आरोपी तेजश्री जगताप यांचा उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

ByMirror

Mar 19, 2024

लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स फसवणुक प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स मध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून 83 लाख 61 हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी व पैसे मागितल्यास अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आरोपी तेजश्री जगताप यांना उच्च न्यायालयाने सोमवारी (दि.18 मार्च) अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. फसवणुक व एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या जगताप यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.


मानसी कौस्तुभ घुले (रा. शिवाजीनगर, कल्याण रोड) या शिक्षिकेने व त्यांच्या नातेवाईकांना 5 टक्के व्याजदराने पैसे मिळण्याच्या अमिषाने अजय व जयश्री जगताप यांच्याकडे लिओ हॉलिडे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स मध्ये तब्बल 83 लाख 61 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे नफा देऊ असे घुले यांना सांगितले होते. घुले यांनी सुरुवातीला 1 लाखाची गुंतवणूक केली त्यावर त्यांना 5 टक्के दराने परतावाही मिळाला.

त्यानंतर त्यांनी विश्‍वास टाकून अधिकची रक्कम गुंतवली. मात्र त्यांना परतावा मिळाला नाही म्हणून त्यांनी पैशाची मागणी केली. मात्र जगताप यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे घुले व त्यांचे नातेवाईक तसेच इतर काही लोकांनी जगताप यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने व त्यांना पैसे मागितल्यास अपहरणाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला फसवणुक व एमपीआयडीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.


तेजश्री जगताप यांच्या वतीने ॲड. सत्यजीत कराळे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी होवून ॲड. कराळे पाटील यांनी आरोपीने फक्त फोनवर फिर्यादी यांच्याशी संभाषण केले असून, या प्रकरणात त्यांच्यावर फसवणुक व एमपीआयडी गुन्ह्याचे कलम लागू होत नाही व प्रथमदर्शनी पुरेसा पुरावा नसल्याचे युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश नितीन सुर्यवंशी यांच्या न्यायालयाने तेजश्री बाळासाहेब जगताप यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *