वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मुल्यांचा प्रवाह -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यादानासह पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळीत योगदान देणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर विनय महाजन, नवनाथराव आमले, सुरेखाताई शिवगुंडे-आमले आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, संजय ढोणे व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दीपक अमृत, जहीर सय्यद, नीताताई देवराईकर, ज्योती भिंगारदिवे, प्रांजली सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, संजय भिंगारदिवे, दीपकराव धाडगे, रतनशेठ मेहेत्रे, मनोहरराव दरवडे, सुधीर कपाळे, अशोकराव पराते, अविनाश जाधव, दीपक घोडके, विलासराव आहेर, सुभाष पेंढुरकर, बाळासाहेब निकम, रामनाथ गर्जे, राजू कांबळे, दीपकशेठ मेहतानी, सरदारसिंग परदेशी, कोंडीराम वाघस्कर, सुंदरराव पाटील, मुन्ना वाघस्कर, सुहास देवराईकर, निजाम पठाण, बाळासाहेब वाघस्कर, नवनाथ वेताळ, सखाराम अळकुटे, दशरथराव मुंडे, शशिकांत पवार, विकास निमसे, विशाल भामरे, अजय खंडागळे, संजय भावसार आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार व सामाजिक मुल्य जिवंत ठेवणारा प्रवाह आहे. चार भिंतीच्या आत पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जगात भरारी घेण्यासाठी पंखात ज्ञानरुपी बळ देण्याचे कार्य शिक्षक करतात. पर्यावरण संवर्धनाची चळवळही शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वसंत राठोड म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा खरा दिशादर्शक आहे. राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. फक्त शाळेतले धडे शिकवणे एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून, ते समाजात जागरूकता, संस्कार, शिस्त व मुल्ये रुजविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिनशेठ चोपडा म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या दोन महत्वाच्या चळवळी समाजापुढे उभ्या आहेत. या चळवळींना गती देण्याचे सामर्थ्य शिक्षकांकडे आहे. मुलांमध्ये जागृती निर्माण करून उज्वल भवितव्य घडविण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रमेश वराडे व सुरेखा आमले यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.