• Sat. Jul 19th, 2025

एल्गार मेळाव्यात सकल केडगाव ओबीसी समाजाच्या वतीने चहा-नाष्ट्याची सेवा

ByMirror

Jan 30, 2024

केडगावात एल्गार मेळाव्याचे फाडण्यात आलेल्या फलकाचा निषेध

मेळाव्या पूर्वीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी (दि.3 फेब्रुवारी) होणाऱ्या ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या एल्गार मेळाव्याचे जंगी नियोजन सुरु आहे. सकल केडगाव ओबीसी समाजाच्या वतीने मेळाव्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांसाठी अल्पोपहार व चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर व सामाजिक कार्यकर्ते किशोर जेजूरकर यांनी दिली.


मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणास विरोध करणारे मंत्री भुजबळ यांचा शहरातील क्लेरा ब्रुसच्या मैदानावर एल्गार मेळावा होणार आहे. यामध्ये राज्यातील ओबीसी समाज एकवटणार असून, मेळाव्यात आलेल्या समाजबांधवांचा नाष्टा, चहा-पाणाची जबाबदारी सकल केडगाव ओबीसी समाजाने स्विकारली आहे. त्या दृष्टीकोनाने नियोजन करण्यात आले असल्याचे गारुडकर यांनी सांगितले आहे.


तसेच सोमवारी (दि.29 जानेवारी) केडगावमध्ये एल्गार मेळाव्याचे छगन भुजबळ यांचे छायाचित्र असलेले लावण्यात आलेले फलक फाडण्यात आलेल्या घटनेचा सकल केडगाव ओबीसी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर मेळाव्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अशा प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांना वेळीच अटक करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *