आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गोहेर यांचा सत्कार
गोहेर यांची प्रदेशाध्यक्षपदी लागलेली वर्णी ही शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते तालेवर सेवक रामजी गोहेर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजीत पवार गट) अनुसूचित जाती जमाती विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सनी खरारे, शुभम टाक, मनपा सफाई कामगार युनियनचे उपाध्यक्ष अजय सौदे, प्रशांत पाटोळे, संतोष सारसर, देविदास धुलिया, आकाश कुडीया, नरेश चौहान, विकास पंडित, दिलीप सुर्यवंशी, गोविंद घोडके आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती समाजाला न्याय देण्याचे काम करण्यात आले आहे. सत्तेत असताना त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे काम करुन त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे.
तालेवर गोहेर यांची प्रदेशाध्यक्षपदी लागलेली वर्णी ही शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. अनुसूचित जाती जमाती मधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार राहणार असल्याचे स्पष्ट करुन गोहेर यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समाजातील अंतिम घटकांसाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तालेवर गोहेर यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती जमाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.