• Wed. Oct 29th, 2025

आदर्श सासू व सुन पुरस्काराने सुंदरबाई आणि ज्योती भोगाडे यांचा सन्मान

ByMirror

May 7, 2024

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका ज्योती भगवान भोगाडे व त्यांच्या सासूबाई सुंदरबाई भाऊसाहेब भोगाडे (रा. निंबोडी, जामखेड रोड) यांना आदर्श सासू व सुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्व.सौ. ललिता बलदोटा यांच्या स्मरणार्थ पद्मश्री पोपट पवार व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भोगाडे सासू व सुनेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजेंद्र बलदोटा, प्राजक्ता बलदोटा, हर्षल ओसवाल, प्रियंका ओसवाल आदी उपस्थित होते.


शहरातील बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन्स मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी पद्मश्री पोपट पवार यांनी आजच्या व पूर्वीच्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य केले. व्याख्याते अविनाश भारती यांनी आदर्श सासू व आदर्श परिवार यावर मार्गदर्शन केले.
ज्योती भोगाडे म्हणाल्या की, या मागील 21 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहे. सासू व सासरे शेती करत असून, दोघांनीही पंच्च्यात्तरी पार करुन आनंदाने राहत आहे. नोकरीला लागण्यापूर्वी सासू सुंदरबाई भोगाडे यांनी प्रोत्साहन देऊन कुटुंबाचा सांभाळ केला. घरापासून लांब राहून नोकरी केली. आजही त्या भक्कमपणे पाठिशी उभ्या असल्याने नोकरी करता आली.

त्या अशिक्षित असताना सुनेच्या नोकरीसाठी त्यांनी दिलेले पाठबळ प्रेरणादायी आहे. सासूबाईने नोकरीबरोबरच मुलांना घडविण्यात मोठे योगदान दिले. मोठा मुलगा हरिदास अमेरिकेत असून, त्याने तिथे 400 एकर जमीन घेतली आहे. तो नोकरीबरोबर शेतीही करतो. मोठ्या जाऊबाई प्रभावती भोगाडे एक शिक्षिका असून, अमेरिकेतील शाळेत त्या अध्यापन करण्याचे काम करतात. पती भगवान भोगाडे एक शेतकरी असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. दोन नणंद अंगणवाडी सेविका असून, शेती व उद्योग व्यवसायात प्रगतीपथावर आहेत. हा संपूर्ण कुटुंब सासूबाई यांच्या संस्कार व मार्गदर्शनाने उभा राहिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आदर्श सासू व सुन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *