लोंढे मळ्यातील प्रलंबित ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी
नगर (प्रतिनिधी)- केडगावच्या लोंढे मळ्यात प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईनचे प्रश्न अखेर मार्गी लागले असून, हे काम आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून व युवा नेते सुमित लोंढे यांच्या पाठपुराव्याने झाले आहे.सदर काम मार्गी लावल्याबद्दल सुमित लोंढे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात दत्तात्रय जाधव, विकास विधाते, दादा नेमाने, सागर लोंढे, सोमनाथ दळवी, दत्तात्रय विधाते, बाळकृष्ण लोंढे, सुभद्रा दळवी, रेणुका लोंढे, दत्ता गिरमे, कोमल लोंढे, सारिका शिंदे, संतोष शिंदे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पायाभूत सुविधांचा अभाव होता. विशेषतः ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात घरासमोर साचणारे पाणी, दुर्गंधी, डास व आजारांचे प्रमाण वाढले होते. हे काम मार्गी लागल्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केली.
सुमित लोंढे म्हणाले की, लोंढे मळ्यातील गजानन नगर, गणेश मंदिर परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईनच्या कामाची मागणी करत होते. हा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांच्या निधीतून हे काम मंजूर करण्यात आले. या कामामुळे परिसरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण सुधारण्यात मोलाची भर पडेल. पुढील काळातही लोंढे मळ्यासह परिसरातील विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ह.भ.प. सोनाजी शिंदे महाराज म्हणाले की, पावसाळ्यामध्ये लोंढे मळा परिसरात ड्रेनेज लाईन नसल्याने मोठी दुर्गंधी पसरत होता. पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरत होते. मात्र ही समस्या सुमित लोंढे यांनी सोडविल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला असल्याचे त्यांनी सांगितले.