एम.एम.वाय.टी.सी.च्या वतीने सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी अहिल्यानगर येथील श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मलखांब योगा ट्रेनिंग सेंटरचा मल्लखांब खेळाडू सुहास जयसिंग शिरसाठ याची श्री बालाजी युनिव्हर्सिटी पुणे या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. 24 ते 27 ऑक्टोबर दरम्यान चेन्नई येथे होणार होत आहे.
सेंटरचे मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग यांनी सुहास शिरसाठ चा या यशाबद्दल सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तर अहिल्यानगर शहरामध्ये मल्लखांब, योगासनामध्ये उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
एम.एम.वाय.टी. सेंटरच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मल्लखांब आणि योगासन यासारख्या देशी खेळामध्ये घडवण्याचे कार्य सुरू असून, अनेक खेळाडू पुढे येत असल्याची माहिती आप्पा लाढाणे यांनी दिली. सुहास हा प्रगतीशील शेतकरी जयसिंग जनार्धन शिरसाठ यांचा मुलगा असून, त्याला बालाजी यूनिवर्सिटीचे (पुणे) प्राध्यापक संदीप तिकोने यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी मल्लखांब आणि योगासनाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक प्रणिता तरोटे, अक्षय पावडे यांनी देखील त्याचे अभिनंदन केले.
