अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सुभाष किशनचंद आहुजा यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असायचा.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक जनक आहुजा यांचे ते मोठे बंधू होते. तर घर घर लंगर सेवेचे सेवादार अनिश आहुजा यांचे ते वडिल होते.
बुधवारी (दि.24 जुलै) त्यांच्या पार्थिवावर नालेगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.