जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.24 सप्टेंबर) रोजी खुली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विवेक संकपाळ पाटील, उपाध्यक्ष हेमलता काळाणे, सचिव बाळासाहेब ढवळे यांनी केले आहे.
रविवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर दुपारच्या सत्रात खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार आहे. ही स्पर्धा केजी, ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 7 व वैदिक मॅथ्स या गटात होणार आहे. ही स्पर्धा दिवसभर चालणार असून, विद्यार्थ्यांचा नाश्ता व जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रत्येक ग्रुपमध्ये पहिला, दुसरा, तिसरा व चॅम्पियन बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी 9049484484 व 9766221188 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
