• Thu. Oct 16th, 2025

साथीचे आजार टाळण्यासाठी देहरे गावात औषध फवारणी सुरु

ByMirror

Aug 9, 2024

आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आली तातडीची बैठक

साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी गावपातळीवर यंत्रणा सज्ज -प्रा. दीपक जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात साथींच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहरे (ता. नगर) येथील ग्रामपंचायतमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत साथीचे आजार रोखण्यासाठी उपाय योजनात्मक निर्णय घेण्यात आले असून, गावात फॉगिंग मशीनद्वारे धूर व औषध फवारणीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.


गावचे उपसरपंच प्रा. दीपक जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, गावातील सर्व खाजगी डॉक्टर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, हायस्कूलचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये शाळेतील सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याच्या मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या डेंग्यू ,मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांची साथ शहरासह नगर तालुक्यात पसरत आहे. गावात देखील काही रुग्णांमध्ये ती लक्षणे दिसून आल्याने तातडीची बैठक घेऊन साथीचे आजार रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तन नाशक फवारणी, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी, टीसीएल पावडर टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थांना या आजाराचा सामना करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायत सर्व तयारी करणार असल्याचे उपसरपंच प्रा. दीपक जाधव यांनी सांगितले.


या आढावा बैठकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य अजित सर्जेराव काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. डोरले, माने, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे, करंडे वस्तीचे मुख्याध्यापक विलास पगारे, नवभारत विद्यालयाचे शिक्षक अंकुश बर्डे, अशोक लष्करे, डॉ. जगदीश निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार साळवे, लिपिक दीपक बर्डे, विजय भगत, अंगणवाडी सेविका सुमन कल्हापुरे, मीरा पवार, मंगल काळे, बानो शेख आदी उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *