• Mon. Jul 21st, 2025

केडगावच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Nov 25, 2023

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

380 रुग्णांची मोफत तपासणी तर 113 रुग्णांवर होणार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जोपासताना व्यवसायाला समाजसेवेची जोड असवी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी जोपासून व्यवसाय करत आहे. फक्त आर्थिक दृष्टीकोन न ठेवता समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, शोरुमचे जनक आहुजा, बुधराणी हॉस्पिटलचे प्रकाश धर्माधिकारी, उद्योजक रवींद्र बक्षी, अनिश आहुजा, जतीन आहुजा, कैलाश नवलानी, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, सुनिल थोरात, जय रंगलानी, संतोष लांडे, वैभव वाघ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, वासन परिवार संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असताना राज्यातील अनेक युवकांना रोजगार देण्याचे काम केले. तर कोरोना काळातही नाशिक मध्ये अन्न छत्र चालवून गरजूंना आधार दिला. तर नगर शहरातील लंगर सेवेला देखील त्यांनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात जनक आहुजा यांनी वासन ग्रुपची स्थापना स्वर्गीय कुंदनलालजी वासन यांनी 1961 मध्ये नाशिक येथे केली. त्यांनी लावलेले छोट्याच्या रोपांचे आज विजय वासन आणि तरुण वासन यांनी मोठ्या वटवृक्षात रुपांतर केले. या उद्योग समुहाच्या वतीने सामाजिक सेवाभाव जपून श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, दरवर्षी होणाऱ्या या शिबीराच्या माध्यमातून मोफत वंचितांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम केले जात आहे. या शिबिराने सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड देऊन वासन ग्रुपचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिराला शहरासह उपनगरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संध्याकाळ पर्यंत तब्बल 380 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तर 113 रुग्णांवर बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. शिबिराला आमदार अरुणकाका जगताप यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते 137 गरजूंना मोफत नंबरचे चष्म्यांचे वाटप करण्यात आले. रुग्णांची तपासणी गिरीश पाटील, सिस्टर माया आल्हाट, मनिषा कोरडे, यांनी केली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शिबीरार्थींसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासन टोयोटाचे सहकारी दिपक जोशी, प्राची जामगावकर, प्रविण जोशी, अविनाश लाळगे, समीर पवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *