निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम 57 परिवाराच्या माध्यमातून स्वप्निल पर्वते यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. त्यांनी व्यवसायात प्रगती साधून सामाजिक भावनेने योगदान देत आहे. मोठ्या शहरांच्या धर्तीवर नगरमध्ये जीम उभारुन आरोग्य चळवळ रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे. मोठा मित्रपरिवार जोडून त्यांचे सुरु असलेले सामाजिक योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
स्वप्निल पर्वते मित्र परिवाराच्या वतीने निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते.
याप्रसंगी स्वप्निल पर्वते, रामशेठ पर्वते, कालिदास पर्वते, सचिन पर्वते, राज पर्वते, सचिन काळभोर, प्रशांत काळभोर, योगश मोहाडीकर, किरण बगळे, विशाल पवार, पै. वैभव लांडगे, दत्ता खैरे, आशिष बच्छावत, सुमित पर्वते, ऋषी पर्वते, संदीप सपाटे, नाना साळवे, दिनेश जाधव, अक्षय विधाते, अमोल म्हस्के, महेश अवघड, गिरीश कानडे, ओमकार पाटकर, राहुल सुतार, साहिल पेंटा, नयन सोनीमंडलेचा, प्रसाद चौधरी, एमएमए मॅट्रिक्स जीम, आनंद कन्स्ट्रक्शन व टीम 57 परिवारचे सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वप्निल पर्वते म्हणाले की, समाजातील आजचे विद्यार्थी उद्याचा भविष्य आहे. वंचित घटकातील मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. टीम 57 परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम सुरु आहे. उपेक्षितांना केलेली मदत हेच जीवनातील समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
