स्नेहबंधचे नि:स्वार्थ भावनेने सामाजिक, शैक्षणिक काम -राकेश ओला
नगर (प्रतिनिधी)- समाजातील गरजू, वंचित, निराधार, गरीब विद्यार्थी व ज्येष्ठांसाठी नि:स्वार्थ भावनेने स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे कार्य करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
पुढे पोलीस अधीक्षक ओला म्हणाले की, डॉ. उद्धव शिंदे हे स्नेहबंध फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवतात, तसेच पर्यावरण रक्षणासाठी ही वृक्ष लागवडीद्वारे कार्य करत आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयातही त्यांनी गेल्या पाच वर्षात अनेक झाडे लावली आहेत, समाजातील वंचितांबद्दल व पर्यावरण रक्षणाबद्दलची त्यांची तळमळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिंदे यांच्या सामाजिक कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
